श्री रामचंद्र शेळके आप्पा यांची मराठा संघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड

बांबवडे : मराठा सेवा संघाच्या शाहूवाडी तालुकाध्यक्ष पदी डोणोली ता. शाहूवाडी येथील श्री रामचंद्र आनंदा शेळके ( आप्पा ) यांची निवड करण्यात आली आहे. तशा आशयाचं नियुक्ती पत्र संघाच्या वतीने त्यांना देण्यात आलं आहे. त्यांच्या या निवडीने एका सामाजिक कार्यकर्त्याला योग्य न्याय मिळाला आहे. अशीच प्रतिक्रिया बांबवडे पंचक्रोशीतून व्यक्त करण्यात येत आहे. त्यचबरोबर त्यांचे अभिनंदन सुद्धा समाजातील विविध स्तरातून करण्यात येत आहे. साप्ताहिक शाहूवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने देखील त्यांचे हार्दिक अभिनंदन, आणि त्यांच्या या सामाजिक वाटचालीस शुभेच्छा.

श्री रामचंद्र शेळके आप्पा हे एक सामाजिक कार्यकर्ते असून समाजातील विविध समाजोपयोगी कामात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. नुकत्याच येवून गेलेल्या पूर परिस्थितीत त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदान शिबीर घेवून त्या परिस्थितीतील लोकांना जीवनदान देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. अशा प्रकारच्या विविध कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असतो.

त्यांना मराठा सेवा संघ अकोला नोंदणीकृत, या संघटनेकडून, त्यांच्या जिल्हा कार्याध्यक्ष नेताजी चौगले व सचिव सचिन माने यांच्या सही चे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

पुन्हा एकदा रामचंद्र आनंदा शेळके ( आप्पा )यांचे अभिनंदन आणि त्यांच्या समाजिक वाटचालीस साप्ताहिक शाहूवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने शुभेच्छा.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: