सत्यशोधक आण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे तुरुकवाडी इथं आयोजन

बांबवडे : सत्यशोधक आण्णाभाऊ साठे विद्यार्थी, युवा साहित्य संमेलन मंगळवार दि. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी दहा वाजलेपासून तीन सत्रांमध्ये संपन्न होत आहे. हे साहित्य संमेलन ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन, कोल्हापूर, कानसा वारणा फौंडेशन, महाराष्ट्र, युनिव्हर्सिटी स्टुडंटस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन दत्तसेवा विद्यालय तुरुकवाडी,ता. शाहूवाडी या ठिकाणी संपन्न होणार आहे.

या संमेलनाचे उद्घाटन सकाळी १० ते १२ वाजनेच्या दरम्यान ज्येष्ठ नाटककार राजाभाऊ शीरगुप्पे यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अजय कांडर हे असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकुमार नलगे, ज्येष्ठ विचारवंत प्रा.विजयकुमार जोखे यांची उपस्थिती असणार आहे.

पहिल्या सत्रात उद्घाटन समारंभ असून दुसऱ्या सत्रात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, या परिसंवादाचा विषय “ आण्णाभाऊ साठे यांचे विचार व विद्यार्थी युवकांची जबाबदारी ” असणार आहे. परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. मालती पाटील असणार आहेत, तर यामध्ये डॉ. सदाशिव पाटील, अशोक कुंभार, प्रा. उमाकांत हत्तीकट, प्रा. सागर कांबळे यांचा सहभाग असणार आहे. दु.२.३० ते ३ वाजनेच्या दरम्यान कथाकथन होणार आहे. याचे अध्यक्ष बाबासाहेब परीट, असणार आहेत, तर हींमत पाटील यांचा सहभाग असणार आहे.

शेवटच्या सत्रात कवी संमेलन होणार असून, याचे अध्यक्ष सुनील चिंचोलकर, निवेदक गोविंद देसाई असणार आहेत, तर अशोक जाधव, रमेश डोंगरे, सचिन सकटे, विठ्ठल वडाम, अशोक कुंभार, विलास तोळसणकर, वैभव पाटील, अजित पाटील, रमेश नाईक, कार्तिक पाटील, नथुराम कुंभार आदी मान्यवर कवींचा सहभाग असणार आहे.

कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रा. प्रकाश नाईक, असून निमंत्रक हरीश कांबळे आहेत. उद्घाटन सत्रापुर्वी शाहीर आलम रमजान पटवेगार बागणीकर यांचा शाहिरी कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात भाई भारत पाटील, सर्जेराव पाटील पेरीडकर सभापती जि.प.को., आनंदराव माईंंगडे, दीपक पाटील (समाजसेवक कर्जत ), हंबीरराव पाटील जि.प.स., दिलीप पाटील माजी उपसभापती पं.स.शाहूवाडी, एस.एन.पाटील, कृष्णा पाटील सरपंच विरळे, गणपती कांबळे सरपंच तुरुकवाडी, विनायक हिरवे, डॉ. संजय मगदूम, पांडुरंग दळवी, प्रकाश कांबळे, डॉ.संजय पाटील, हनमंत कवळे, विश्वास कोतोलीकर, प्रशांत आंबी, सतीश नांगरे, चंद्रकांत कदम, प्रा. बाळासाहेब नायकवडी पं.स..स. शिराळा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: