शाहूवाडी इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) संघटनेची बैठक उत्साहात संपन्न

बांबवडे : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) शाहूवाडी तालुक्यात प्रचार व प्रसार करून संघटनेची बांधणी करण्यासंदर्भात शाहूवाडी येथील विश्रामगृहात बैठक संपन्न झाली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते श्री जगन्नाथ नलवडे यांची उपस्थिती होती. या बैठकीत शाहूवाडी तालुक्यात गाव तिथं संघटनेची शाखा काढणे, संघटनेचा प्रचार व प्रसार करणे, तसेच जिल्हापरिषद गट नुसार संघटनेची बांधणी करणे,  व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे आदी विषयांवर चर्चा झाली. आणि हे विषय बहुमताने मंजूर करण्यात आले.

रिपाई हि संघटना शोषित, पिडीत समाजासाठी वरदान ठरावी, यासाठी या संघटनेची निर्मिती झाली आहे. हि संघटना केवळ मागासवर्गीय समजासाठी नसून, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मजूर, कामगार बंधुंसाठी सुद्धा काम करीत आहे.

यावेळी रिपाई (अ) संघटनेचे कार्याध्यक्ष सरदार वसंत कांबळे, विजय आनंदा लोखंडे उपाध्यक्ष, अशोक केशव गायकवाड सचिव, संदीप गणपती कांबळे युवा अध्यक्ष, राम भाऊ परळीकर, सुनील ब. कांबळे, संजय नलवडे आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: