क्रांतीच्या विचारांची ठिणगी : सरदार वसंत कांबळे

बांबवडे : घुंगुर तालुका शाहूवाडी इथं क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी या झुंझार क्रांतीविराच्या विचारांची ठिणगी पडली. आणि पाहता, पाहता या ठिणगी ची मशाल कधी झाली,हे कळलेच नाही. आणि ती ठिणगी म्हणजे सरदार वसंत कांबळे,हे व्यक्तिमत्व होय.  समाजातील तत्कालीन अनिष्ट रुढींनी दलित समाज भरडला जात होता, तेंव्हा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने एक नवचैतन्य दलित समाजाला लाभलं, आणि समाज बदलू लागला. त्यांच्या मूलमंत्राने समाज ढवळला. शिका संघटीत व्हा,आणि संघर्ष करा. नेमका हा मंत्र सरदार यांनी हृदयात ठेवून समाजातील अनिष्ट रूढींवर आघात करायला सुरुवात केली. त्यांनी सर्व प्रथम दार लोटा ,हि प्रथा गावात बंद पाडली. आणि नागनाथअण्णांच्या क्रांतीची हि ठिणगी मशाल झाली.

दलित शोषित पिडीत समाजाला दिशा दाखवणे,हि काळाची गरज असून, यासाठी आपलं योगदान असायलाच पाहिजे, या विचारांनी भारावून गेलेल्या सरदार कांबळे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)  केंद्रीय न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या संघटनेच्या माध्यमातून समाजाला उन्नती देण्याचा प्रयत्न केला आहे. दलित समाजातील जनता आर्थिक दृष्ट्या नेहमीच मागास राहिली आहे, याचे मूळ कारण म्हणजे समाजात असलेलं अज्ञान. यासाठी सर्व  समाजाने शिक्षित होणं, हि काळाची गरज आहे. याचबरोबर समाजात असलेली व्यसनाधीनता हि या समाजाच्या दारिद्र्याचे मुल कारण आहे. यासाठी व्यसनमुक्ती अभियान सरदार यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने राबवले. समाज केवळ शिक्षित होवून चालणार नाही, तर त्यांच्यावर असलेल्या अनिष्ट रुढींचा पगडा बदलणे गरजेचे आहे, त्यासाठी प्रबोधन करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या दलित समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं. अशा महान नेत्याच्या विचारांची आपण जपणूक केली पाहिजे. त्याचबरोबर त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न म्हणजे हा समाज शिक्षित होवून आर्थिकदृष्ट्यासुद्धा संपन्न झाला पाहिजे, यासाठी तरुणांना नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. एकेकाळी असलेली दार लोटा प्रथा एका गावातून बंद पाडणे, हि सोपी गोष्ट नाही, ती पद्धत बंद करण्यात सरदार यशस्वी झाले आहेत.

अशा समाजाला खऱ्या अर्थाने प्रबोधानासाहित मार्गदर्शन गरजेचे आहे, ते काम सरदार कांबळे करीत आहेत. एकेकाळी इंग्रज सरकारला पत्रीसरकार काढून नामोहरम करणारे क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या चळवळीच्या विचारांची जोपासना करणारा हा कार्यकर्ता, खऱ्या अर्थाने दलित शोषित,पिडीत समाजाचा मार्गस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या या वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा.

2+
2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: