शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी- मराठा महासंघ

बांबवडे : २०१९ सालात नुकत्याच येवून गेलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा सर्वच शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे शाहूवाडी तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांनी केली आहे.

येवून गेलेल्या महापुरात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, परंतु पंचनामे होवूनही शेतकऱ्यांपर्यंत पुरेशी नुकसानभरपाई मिळालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. या प्रश्नाकडे प्रशासकीय मंडळींनी  गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.

तेंव्हा शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. यामध्ये कार्याध्यक्ष अमर पाटील, सुरेश घाटगे, संगम पाटील, प्रदीप नाईक, विजय पाटील, विजय चिखलकर, सुभाष पाटील आदी मान्यवर सहभागी आहेत.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: