शाहूवाडी पंचायत समिती चे वाहन नेमके कोणासाठी जनतेसाठी कि पदाधिकाऱ्यांच्या खाजगी कामासाठी ?

बांबवडे : शाहूवाडी पंचायत समिती चे चार चाकी वाहन नेमके कशासाठी असते ?, हे वाहन चालविण्याचा अधिकार नेमका कोणाला असतो ?, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडले असून,याबाबत पंचायत समिती चे गटविकास अधिकारी यांनी या प्रश्नांची उत्तरे जनतेला द्यावीत, अशी मागणी जनतेतून केली जात आहे. प्रशासनाचा कोणताही अंकुश नसल्याने या घटना सामोऱ्या येत आहेत, हेच यावरून स्पष्ट होत आहे.

दरम्यान शाहूवाडी पंचायत समिती चे वाहन अनेकवेळा बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात दिसून येते,त्याप्रमाणे आज दि. ६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ७ ते ९ वाजण्याच्या दरम्यान चालकाशिवाय दिसून आल्याची माहिती आहे.  

शाहूवाडी पंचायत समिती चे वाहन क्र. MH-09- AC-0428  बांबवडे ता. शाहूवाडी परिसरात नेहमीच आढळून येत असते. बांबवडे पंचक्रोशीत अशी किती विकासकामे पंचायत समिती ने राबवली आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे. पंचायत समिती चे वाहन हे शासनाच्या नियमानुसार तालुक्यातील विकास कामांसाठी वापरावयाचे तसेच  पंचायत समिती च्या विविध कलमी कार्यक्रमासाठी वापरावयाचे आहे,  असा नियम आहे. सदर वाहनाचे दररोज लॉगबुक भरावयाचे असते. हे नेहमी भरले जाते का ? याची माहिती मिळणे गरजेचे आहे. याचबरोबर या वाहनावर शासनाचा चालक असतो का?,याचे उत्तर बहुतांश नसतो, असे मिळते. पंचायत समिती चे वाहन पदाधिकाऱ्यांच्या खाजगी कामासाठी वापरले जात आहे. यावर प्रशासनाचा अंकुश दिसून येत नाही.  ज्यावेळी हे वाहन पदाधिकारी चालकाशिवाय वापरतो, तर पंचायत समिती चा  चालक नेमका या वेळेत कुठे असतो? आणि का? असे अनेक प्रश्न पुढे येत असून, यामागे प्रशासनाचा ढिसाळ कारभार दिसून येत आहे.

नेमके हे वाहन कोणासाठी जनतेसाठी कि पदाधिकाऱ्यांच्या खाजगी कामासाठी असा प्रश्न निर्माण होत आहे.

3+
3+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: