‘ अब तुम्हारे हवाले वतन साथियो ‘-शित्तूर येथील जवान शहीद
बांबवडे : शित्तूर तर्फ मलकापूर तालुका शाहुवाडी येथील जवान श्री सुनील विठ्ठल गुजर वय २७ वर्षे आपल्या मोहिमेवर कर्तव्य बजावत असताना, ते शहीद झाले आहेत. अशी माहिती शासकीय सुत्रांक्कडून मिळत आहे.
‘ जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले ‘. या ओळी आपल्याच तालुक्यातील एका वीर जवानाने सत्य करून दाखवल्या आहेत. आपल्याला दिलेली कामगिरी बजावत असताना ते खोल दरीत सुमारे ४०० ते ५०० फुट असलेल्या दरीत कोसळले, आणि त्यांना वीरमरण प्राप्त झाले आहे.
सदर ची घटना १३ मार्चरोजी चायना च्या बॉर्डर वर अरुणाचल मध्ये घडली आहे. एका सैनिकाचं जीवन हे सदैव देशासाठी समर्पित असते. असेच शहीद वीर जवान श्रीसुनील विठ्ठल गुजर ‘ अब तुम्हारे हवाले वतन साथियो ‘असे म्हणत शहीद झाले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी व ५ महिन्याचे लहान मूल आहे. दरम्यान शहीद गुजर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासाठी तालुक्याचे तहसीलदार श्री रामलिंग चव्हाण हे जातीने तेथील व्यवस्था पहात आहेत. शहीद सुनील गुजर यांचे पार्थिव उद्या संध्याकाळ पर्यंत येईल अशी अपेक्षा आहे. अशी माहिती शासकीय सूत्रांकडून मिळत आहे.
. शहीद जवान सुनील गुजर यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने मानाचा मुजरा, आणि मानवंदना .