आपल्या हक्काच्या माणसाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.: सर्जेराव पाटील पेरीडकर दादा यांचा आज वाढदिवस
बांबवडे : सर्वसामान्य जनतेच्या व्यथांची विचारपूस करणारं व्यक्तिमत्व, एवढेच नव्हे त्या व्यथा दूर करण्यासाठी शक्य तो प्रयत्न करणे, हा ज्यांचा स्थायीभाव आहे अशा व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे जिल्हा परिषद सदस्य श्री सर्जेराव पाटील पेरीडकर दादा हे होत. त्यांना आजच्या दिवशी साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
सर्जेराव दादा म्हणजे सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ. इथं आपल्या तक्रारींना नक्की न्याय मिळतो. इथं आपला हक्क कोणी मारत नाही. तसेच आपल्यावर अन्याय करण्याचा कोणी प्रयत्न करण्याला धजावत नाही. असं हे व्यक्तिमत्व प्रत्येकाला आपल्या जवळचं व्यक्तिमत्व वाटतं. इथं आम्हा पत्रकार मंडळीना देखील नेहमीच सन्मानाची जागा मिळाली आहे.
सर्जेराव दादा हे तालुक्यातील असं व्यक्तिमत्व आहे, कि, ज्याला सामान्य जनता कधीच विरोध करीत नाही. शाहुवाडी तालुक्यात या मागील इतिहासात अनेकांनी त्यांचा फक्त वापर करून घेतला. परंतु दादांनी कधीही त्याबाबत कोणतीही तक्रार केली नाही. कधी कोणत्या नेत्यांच्या विरोधात राजकीय आकसापोटी ब्र काढलेला नाही. परंतु त्यांचा वापर मात्र अनेकांनी आपल्या राजकारणासाठी करून घेतला. असो. परंतु तालुक्याचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी मात्र त्यांचा वापर येथील जनतेच्या विकासासाठी करून घेतला. आणि कोट्यावधींचा निधी तालुक्यात कार्यरत झाला.
येथील वाड्या-वस्त्या दादांच्या सहकार्यामुळे विकासाचे तोंड पाहू शकल्या. अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार दादांच्या सहकार्यामुळे झाले. इथल्या सामान्य माणसाला दादा हे आपल्या कुटुंबातील सदस्य वाटतात.
असं. हे व्यक्तिमत्व आज बहरलं आहे. त्यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे आयुष्य इंद्रधनुच्या सप्तरंगांनी उजळावे, मोरपंखांची तलमता त्यांच्या आयुष्याला मोहरून जावी. याच दादांना शुभेच्छा. आपल्या हक्काच्या माणसाचा वाढदिवस म्हणजे सामान्य जनतेसाठी आनंदाची पर्वणीच म्हणावयास हरकत नाही.
पुनश्च आपल्या हक्काच्या माणसाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
दरम्यान सर्जेराव दादांच्या वाढदिवसानिमित्त ५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन त्यांच्या कार्यालय स्थळी आयोजित केले आहे. रक्तदान स्थळ : पेरीड नाका मलकापूर.