कलाकारांना व्यासपीठ बाळासाहेबांची शिवसेना संघटनेने दिले – खास. धैर्यशील माने
शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यात पारंपारिक कला जोपासणाऱ्या कलाकारांना नवे व्यासपीठ देण्याचे काम बाळासाहेबांची शिवसेना या संघटनेने केलेले आहे. असे मत प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले आहे.

आंबा तालुका शाहुवाडी इथं रिव्हर साईड रिसॉर्ट इथं पर्यटन महोत्सव संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार धैर्यशील माने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे होते.

यावेळी डॉ. विनय कोरे म्हणाले कि, समाज घडविण्याची ताकद शाहिरी कलेत आहेत. आंबा हे उल्लेखनीय पर्यटन स्थळ असून, इथं पर्यटन वाढीसाठी व्यवसाय वाढणे, हि काळाची गरज आहे.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना संघटनेचे तालुका प्रमुख विजयसिंह देसाई सरकार म्हणाले कि, राजकारण बाजूला ठेवून, समाजकारणासाठी एकत्र येवून, लोककलेला आश्रय दिला पाहिजे.

प्रारंभी कला महोत्सवाचे उद्घाटन विजयसिंह देसाई, प्रा. आनंद गिरी यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी फोनवरून सांगितले कि, कलाकारांना मानधन देण्यासाठी आठ दिवसात समिती गठीत केली जाणार आहे.

यावेळी महोत्सवात माजी बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, तहसीलदार गुरु बिराजदार, नगराध्यक्ष अमोल केसरकर, नियोजन मंडळाचे माजी सदस्य राजू प्रभावळकर, पंचायत समिती सदस्य अमरसिंह खोत, माजी नगराध्यक्ष शामराव कारंडे, अॅड. इंद्रजीत देसाई, उपसरपंच सुरेश कोळापटे, आनंद भोसले, व्ही..एम.मेटकरी, रमेश चांदणे, आदींसह कलाकार, नागरिक उपस्थित होते.