कष्टालाही किताब मिळतो : श्री डवरी आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित
बांबवडे : सध्याच्या युगात सगळ्यांवरून लोकांचा विश्वास उडत चालला असताना, सरूड येथील एका कष्टकरी पत्रकाराला न्याय मिळाला. सरूड येथील दै. महासत्ता चे पत्रकार श्री नथुराम डवरी यांना कोल्हापूर जिल्हा परिषद चा आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून, पुरस्काराचे वितरण बुधवार दि. २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराज जयंती चे औचित्य साधून करण्यात येत आहे.
श्री नथुराम डवरी यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज, शाहुवाडी तालुका पत्रकार संघ आणि मुकुंद पवार परिवाराकडून हार्दिक अभिनंदन. नथुराम डवरी हे चौफेर लिखाण करणारे दै. महासत्ता चे तालुका प्रतिनिधी असून, त्यांनी सन २०२३-२४ या वर्षात केलेल्या लिखाणाचे गुणांकन नुसार त्यांना हा उत्कृष्ठ पत्रकारितेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. याबद्दल कोल्हापूर जिल्हा परिषद, शाहुवाडी पंचायत समिती यांचे आभार.
नथुराम डवरी हे ग्रामीण भागातील पत्रकार असून, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी पत्रकारिता जपली आहे. गेल्या २५ वर्षातील पत्रकारितेला मिळालेला हा न्याय मानला जात आहे. कधी काळी केवळ वशिल्यालाच किमत मिळते, हा असलेला गैरसमज कोल्हापूर जिल्हा परिषद ने चुकीचा ठरवत कष्टाला सुद्धा न्याय मिळतो, हे दाखवून दिले.
कंदरीत कष्टाला किताब मिळाला असे म्हटल्यास वावगे ठरू नये.