थेरगाव इथं आढळली बिबट्याची दोन पिल्ले – एक पळून गेले
बांबवडे : थेरगाव तालुका शाहुवाडी येथील श्री श्रीकांत पाटील यांच्या शेतात ऊस तोडताना शेतकऱ्यांना बिबट्याची दोन पिल्ले आढळून आलीत. हि घटना आज सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबद्दल घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, थेरगाव येथील श्री श्रीकांत पाटील यांच्या शेतात ऊस तोड सुरु होती. भोवतीचा ऊस तोडून मधला ऊस तोडत असताना, त्यांना हि दोन पिल्ले दिसली. त्यावेळी शेतातील शेतकरी गोळा झाले आणि पिल्लांना पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु त्यातील एक पिल्लू पळून गेले. आणि एक वनक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांच्या जाळ्यात अडकले.
दरम्यान दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या महिलांना एका बिबट्याचे दर्शन झाले होते. त्या महिला त्वरित रानातून घराकडे निघून गेल्या. अशी माहिती मिळत आहे. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेवून शेतकऱ्यांच्या जीविताचे रक्षण करण्याची कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याची वेळ येईल, अशी चर्चा ग्रामस्थांतून ऐकावयास मिळत आहे.