नि:शुल्क समाजसेवा करणाऱ्या गणेश पाटील यांचे अभिनंदन आणि आभार
बांबवडे : समाजात अशीही काही मंडळी असतात, कि जी कोणत्याही अपेक्षेशिवाय समाजासाठी आपले योगदान देत असतात. सध्या माणूस पैसे देवू शकतो, परंतु आपला वेळ देवू शकत नाही. परंतु याला एसटी खात्यातील एक वाहक अपवाद आहेत. ते म्हणजे भाडळे तालुका शाहुवाडी येथे राहणारे श्री गणेश कृष्ण पाटील, हे होत.


गणेश पाटील आपली नोकरी सांभाळून, बांबवडे इथं वाहतुकीची कोंडी होवू नये, म्हणून स्वत: अनेक तास रस्त्यावर उभे राहून एसटी बस व्यवस्थित लावून घेणे, येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांना रस्ता करून देणे. अवास्तव आणि नियमबाह्य पार्किंग करू न देणे, यासाठी राबत असतात. हि सर्व कामे गणेश पाटील हे आपली नोकरी सांभाळून करीत आहेत.

बांबवडे इथं होणारी नित्याची कोंडी फोडण्यासाठी पोलीस खाते, तहसीलदार रामलिंग चव्हाण, ग्रामपंचायत बांबवडे या तिघांनी मिळून काम केले आहे. ग्रामपंचायत बांबवडे चे लोकनियुक्त सरपंच श्री भगतसिंग चौगुले, सुरेश नारकर सोबत सर्व सदस्य तसेच कर्मचारी वृंद यांनी रस्त्यालगत पांढरे पट्टे मारून, त्याच्या आत मध्ये दुचाकी पार्किंग करावी, या हेतूने काम केले आहे. हे पार्किंग निट व्हावे, यासाठी मात्र तासोनतास श्री गणेश पाटील रस्त्यावर उभे राहून, हि शिस्त लोकांना लावत होते. यासाठी निशुल्क सेवा ते बजावत होते. तेही आपली नोकरी सांभाळून करीत होते. ते एसटी खात्यामध्ये कंडक्टर म्हणून काम करीत आहेत.

अशा निशुल्क सेवा समाजासाठी देणाऱ्या श्री गणेश कृष्णा पाटील यांचे मनापासून अभिनंदन. आणि समाजोपयोगी काम केल्याबद्दल त्यांचे बांबवडे ग्रामस्थ यांच्यावतीने मनस्वी आभार.