बांबवडे इथं मराठा समाजाच्या वतीने दि.२ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं उद्या दि.२ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण च्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सकल मराठा समाजाने या आंदोलनाला पाठींबा देम्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन समाजाच्या संयोजकांनी केले आहे.
दरम्यान आज दि.१ नोव्हेंबर २०२३ रोजी साळशी, खुटाळवाडी येथील सकल मराठा समाजाने पदयात्रेने बांबवडे येथील उपोषणाला भेट देवून, समर्थन दिले आहे. यावेळी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देण्यात आल्या.
राज्यभर मराठा आरक्षण चा भडका उडत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्या हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान शाहुवाडी तालुक्यात बांबवडे, सरूड इथं साखळी उपोषण सुरु आहे. बांबवडे इथं वाडीचरण येथील श्री दत्तात्रय सवत हे आमरण उपोषण साठी बसले आहेत.त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. दरम्यान आरोग्य विभाग त्यांच्या प्रकृती च्या तपासणी साठी एकदाच येवून गेले आहेत. आरोग्य विभागाला या आमरण उपोषणाचे गांभीर्य वाटत नाही का ? असा प्रश्न मराठा कार्यकर्ता करीत आहे.
दरम्यान आज दि.१ नोव्हेंबर २०२३ रोजी शाहुवाडी तहसीलदार श्री रामलिंग चव्हाण यांनी उपोषण स्थळी भेट देवून, श्री दत्तात्रय सावत यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु श्री दत्तात्रय सावत हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तरी प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील तहसीलदार यांनी मराठा कार्यकर्त्यांना केली आहे.