बांबवडे त ” बिबट्या ” दाखल : एका कुत्र्याचा फडशा …
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं उदय सह.साखर कारखाना परिसरात बिबट्या दाखल झाल्याचे निदर्शनास आले आहे.
येथील श्री जयसिंग निकम तात्या ( रणजीत डेकोरेटर्स ) यांच्या घराबाहेर असलेल्या त्यांच्या पाळीव कुत्र्यावर काल मध्यरात्री च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून त्याचा फडशा पाडलेला निदर्शनास आले आहे. दरम्यान घराबाहेर बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. या परिसरात अनेकांचे जनावरांचे गोठे आहेत. तरी ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी.
वन विभागाने या कडे त्वरित लक्ष घालून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा. आतापर्यंत या पंचक्रोशीत बिबट्याने हल्ला करून अनेक शेळ्या – मेंढ्यांना भक्ष केले आहे. याबाबत वन विभागाने केवळ कॅमेरा लावण्या व्यतिरिक्त काय काम केले ? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. अद्याप वनविभागाने एकही बिबट्या सापळ्यात पकडलेला माहित नाही. यावरून खात्याचे काम किती यशस्वीपणे सुरु आहे. हेच निदर्शनास येत आहे.
किमान लोकप्रतिनिधींनी तरी याकडे लक्ष द्यावे. केवळ निवडणूक करिता जनतेची आठवण काढण्यापेक्षा इतरवेळी सुद्धा जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी अपेक्षा सर्व सामान्य जनतेची असते. आतातरी याकडे वन खात्याने लक्ष द्यावे.जीवितहानी होण्याची वाट पाहू नये.