सामाजिक

बांबवडे त मोडी चे वर्ग सुरु होणार

बांबवडे : जर आपल्याला मोडी लिपी शिकण्याची इच्छा असेल, तर ती इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.बांबवडे तालुका शाहुवाडी इथं त्याचे आयोजन करण्यात येणार आहे. सध्या मोडी लिपी चे ज्ञान असणे हि काळाची गरज होवू लागली आहे. करण आपला इतिहास हा मोडी त नोंद आहे. त्याचबरोबर आपल्या अनेक शासकीय नोंदी मोडी लिपीत आहेत. त्यामुळे शासकीय स्तरावर देखील याची गरज भासत आहे. यासाठी मोडी लिपी शिकणे गरजेचे आहे. यासाठी छत्रपती शिविअजी महाराज विद्यापीठाच्या वतीने बांबवडे इथं त्याचे शिक्षण देण्यात येणार आहे. अशी माहिती मोडी तज्ञ श्री वसंत सिंघण यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली. हा कोर्स बेसिक स्वरुपात एक महिन्याचा असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या नावाची नोंद नारकर बिल्डींग मधील राज इलेक्ट्रोनिक बांबवडे ,तसेच सुरेश नारकर उपसरपंच यांचे जयश्री जनरल स्टोअर्स बांबवडे एसटी स्थानक समोर यांच्याकडे नोंवावीत. असेही श्री सिंघण बापू यांनी सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!