बांबवडे – मुंबई मार्गावर ट्रॅव्हल्स बस चालकांकडून प्रवाशांची फसवणूक एसी चे पैसे घेवून, एसी च बंद ?
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथून मुंबई साठी जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बस, एसी बस सांगून ग्राहकांना लुबाडत आहेत. याची नोंद समस्त ग्राहकांनी घ्यावी. बुकिंग करताना बुकिंग करणाऱ्या एजंट ला एसी लावणार का ? अन्यथा आमचे पैसे एसी च्या नावाखाली का घेता ? असा प्रश्न विचारणे गरजेचे झाले आहे.

बांबवडे, मलकापूर, ते मुंबई असा प्रवास अनेक ट्रॅव्हल्स करीत आहेत. लोकांना स्लीपर्स ची सुविधा गरजेची असते. कारण महिला, लहान मुले यांना उन्हाचा तडाखा बसत असल्याने स्लीपर्स एसी चे बुकिंग केले जाते. त्यासाठी त्याचा आकार घेतला जातो. परंतु ट्रॅव्हल्स चालक, गाडी बुक केल्यानंतर एसी न लावता गाडी चालवतात. आणि ग्राहकांची लुट करतात.

याबाबत ट्रॅव्हल्स चालकांची कसून तपासणी व्हावी, व ग्राहकांची होणारी लुट थांबवावी, अशी तक्रार परखंदळे सध्या राहणार मुंबई येथील गिरीश कांबळे यांनी केली आहे. सुधारणा न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, याचबरोबर अन्य स्थानिक नागरिकांनी देखील हि माहिती एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.