बांबवडे येथील रंगराव सुतार यांचे निधन : रक्षाविसर्जन ०३/०२/२०२१ रोजी साडेनऊ वाजता
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील एक प्रतिष्ठीत बुजुर्ग व्यक्तिमत्व रंगराव शंकर सुतार (दादा ) वय ९७ वर्षे यांचे वृद्धापकाळाने दि. १ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी साडे पाच वाजनेच्या दरम्यान निधन झाले. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. रक्षाविसर्जन बुधवार दि. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी साडे नऊ वाजता बांबवडे इथं आहे. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
रंगराव सुतार हे बांबवडे येथील प्रसिद्ध आणि बुजुर्ग व्यक्तिमत्व होते. बैलगाडी ची सर्व कामे करणारे ते जाणकार सुतार होते. बैलगाडी ची कामे तसेच लोहार कामे करणारे ते बांबवडे पंचक्रोशीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव तुकाराम व दत्तात्रय सुतार ह्या दोन्ही बंधूंनी आपल्या वडिलांकडून सुतार आणि लोहारकामांचे कसब आत्मसात करीत ,त्यावरच आपला व्यवसाय सुरु केला.
रंगराव दादांचे आणखी एक कसब म्हणजे भजन , मृदुंग वाजविणे या कलांमध्ये देखील ते पारंगत होते. त्यामुळे घरातील सर्व मुले भजनात पारंगत झालीत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांचे नातू प्रवीण लोहार, गणेश सुतार, विवेक, व नितीन सुतार हि नातवंडे देखील तबला वादनात आपले नैपुण्य मिळवत आहे. ह्या सगळ्यांना रंगराव दादांचेच मार्गदर्शन लाभले. अशा व्यक्तिमत्वाच्या निधनामुळे पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.