मलकापूर -शिंपे, सवते मार्गे शिराळा एसटी बस सुरु करावी- जनतेची मागणी
बांबवडे : मलकापूर -शिंपे, सवते मार्गे शिराळा या बससेवेची मागणी विद्यार्थ्यांसह सर्व सामान्य जनतेकडून केली जात आहे.

सरूड, शिंपे, सवते मार्गे मलकपूर अशी एसटी बस सेवा या अगोदर सुरु होती. कोरोना च्या काळात या बस बंद झाल्या त्या झाल्याच. पुन्हा सुरु झालेल्या नाहीत. यामुळे शिवशाहू महाविद्यालय सरूड, एन.डी.पाटील महाविद्यालय पेरीड-मलकापूर, शिराळा रेड महाविद्यालय इथं शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत.

याचबरोबर सर्वसामान्य वर्ग जो दुचाकी घेवू शकत नाही. असा वर्ग देखील या एसटी बस ची आतुरतेने वाट पहात आहे.
तेंव्हा हि बस सेवा सुरु करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.