यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी मध्ये साकारली अवघी ” माउलींची पंढरी “
बांबवडे : यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज डोणोली तालुका शाहुवाडी इथं आषाढी एकादशी विविध कार्यक्रमांनी संपन्न झाली.


यानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करीत चिमुकल्यांची वारकरी दिंडी शाळेत साकारली. यामध्ये कोण विठ्ठलाच्या रुपात साकारले, तर कोण रुख्मिणी च्या रुपात समोर आले.


यामध्ये चिमुकल्यांच्या विठ्ठल रुख्मिणी ला भेटण्यासाठी चिमुकले वारकरी सुद्धा अवतरले होते. टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी शाळेच्या परिसरात अवतरलेली दिसली. यामुळे शाळेचे वातावरण भक्तिमय झाले होते. विद्यार्थ्यांनी अभंग म्हणत चिमुकल्या विठूरायाची आराधना केलेली पहायला मिळाली, तर चिमुकली माऊली डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून दिंडीत सामील झालेली पहायला मिळाली.


या चिमुकल्यांची आषाढी एकादशी संपन्न करण्यासाठी प्राचार्य सचिन जद सर, शिक्षकवृंद, पालक यांचे मार्गदर्शन लाभाले. येथील शिक्षक वृंदाने या दिंडीच्या निर्मितीसाठी परिश्रम घेतले. दरम्यान संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजा पाटील, संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील, व विश्वस्त सौ. विनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी च्या शुभेच्छा दिल्या.