यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली चा निकाल १०० टक्के
बांबवडे : यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली तालुका शाहुवाडी चा दहावी चा निकाल १०० % लागला असून, १०० % विद्यार्थी ८० % च्या वर गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने तसेच शिक्षकवृंदा च्यावतीने हार्दिक अभिनंदन केले असल्याचे प्राचार्य सचिन जद सर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स , एसपीएस न्यूज च्या वतीने सर्व उत्तीर्ण विद्यर्थ्यांचे हार्दिक अभिनंदन . यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली या शाळेने अल्पावधीत आपले कौशल्य दाखवून दिले असून, याठिकाणी विद्यार्थ्यांचे बौद्धिक तसेच खेळातील कौशल्य वाढलेले दिसून आले आहे.
विद्यार्थ्यांनी दहावी च्या परीक्षेत मिळवलेले गुण कौतुकास्पद आहेत. शाळेतील कु. संचाली खाडे हिने ९४.२० % गुण मिळवून, प्रथम आली आहे. कुमार सिद्धेश बिळास्कर या विद्यार्थ्याने ९२.२० % गुण मिळवले . यामुळे हा विद्यार्थी शाळेत दुसरा आला असून, कु.तन्मय खोत याने ८९.८० % गुण मिळवून शाळेतून तिसरा आला आहे.
तसेच कु. सिद्धेश बिळास्कर याला सोशल सायन्स मध्ये ९९, तर मॅथेमॅटीक्स मध्ये ९२ गुण मिळाले आहेत. संचाली खाडे या विद्यार्थिनीला सोशल सायन्स मध्ये ९९, इंग्लिश आणि सायन्स मध्ये ९५, तर मराठी आणि हिंदी मध्ये ९१ गुण मिळाले आहेत.
सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजा पाटील, सचिव डॉ. जयंत पाटील, विश्वस्त सौ. विनिता पाटील यांनी सर्वच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच शाळेचे प्राचार्य श्री सचिन जद सर, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सुद्धा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.