लढाई आहे निष्ठेची, आणि पेटवा ” मशाल ” विजयाची – श्री सत्यजित पाटील
बांबवडे : शिवसेनेच्या भगव्याशी एकनिष्ठ राहून सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी मी निवडणूक रिंगणात उतरलो असून, ज्यांनी भगव्याशी म्हणजे शिवसेनेशी गद्दारी केली , अशा मंडळींना त्यांची जागा दाखवायची आहे. आणि खऱ्या अर्थाने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुन्हा नव्याने उभारण्यासाठी माझी उमेदवारी आहे. असे मत उद्धव ठाकरे शिवसेना चे उमेदवार श्री सत्यजित पाटील आबा यांनी आपल्या प्रचार दरम्यान व्यक्त केले.
यावेळी बांबवडे गावाचे सरपंच श्री भगतसिंग चौगुले यांनी देखील आबांना निवडून आणण्याचा निश्चय केला असल्याचे एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
श्री पाटील पुढे म्हणाले कि, ज्यांच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा निष्ठेने जनतेने सोपवला होता.,त्यांनी ठाकरे साहेबांना खिंडीत गाठून, शिवसेनाच हिसकावून घेतली. हे विश्वासार्ह नाही. तोच भगवा आता पुन्हा नव्या डौलाने फडकावण्यासाठी नवे चिन्ह मशाल या चीन्हासामोरील बटन दाबून निष्ठेच्या शिवसेनेला विजयी करा, असे मत श्री सत्यजित पाटील आबा यांनी व्यक्त केले.
काही मंडळी शेतकरी असल्याचे सांगत आहेत. पण मी सुद्धा शेतकरी आहे. दररोज सकाळी सहा वाजता शेतात असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथांची मला जाणीव आहे. मशाल हे चिन्ह क्रांती चे प्रतिक आहे. आता पुन्हा एकदा नव्याने क्रांती घडविणे गरजेची आहे. असेही श्री सत्यजित पाटील यांनी या प्रचार दरम्यान सांगितले.
दरम्यान शिराळा तालुक्यात मानसिंग भाऊ , इस्लामपूर परिसरात श्री जयंत पाटील आणि सहकारी यांच्यामुळे महाविकास आघाडी प्रचंड मतांनी विजयी होईल, असेही श्री सत्यजित पाटील यांनी सांगितले.