लोकनेते फत्तेसिंगराव नाईक विद्यामंदिर मध्ये आझादी का महोत्सव कार्यक्रम संपन्न
शिराळा प्रतिनिधी : लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर चिखली तालुका शिराळा, इथं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, ” आझादी का महोत्सव ” कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्य्ख्यानाचा विषय ” मोबाईल फोन चे दुष्परिणाम ” हा होता.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री शंकर देसाई सर हे होते. देसाई सर हे विश्वास विद्या निकेतन चे मुख्याध्यापक आहेत. कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक डी.पी. गवळी सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाय.व्ही. खबाले सर यांनी केले.

यावेळी श्री देसाई सर यांनी उपस्थितांना मोबाईल फोन चा वापर करण्यामध्ये फायदे किती, आणि तोटे किती हे समजावून सांगितले. यावेळी त्यांनी अनेक प्रात्यक्षिके सुद्धा दाखवली. त्याचबरोबर मोबाईल विषयक माहिती , त्याचा शोध, इंटरनेट माहिती कशी मिळवायची हे सुद्धा उपस्थितांना समजावून सांगितले यावेळी देसाई सर यांनी कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे आभार सौ.एस.एस. भोसले मॅडम यांनी मानले.