विद्यामंदिर शिंपे च्या वेद संपत पाटील यांची शिंगणापूर च्या ” कुस्ती ” मध्ये निवड
बांबवडे : विद्यामंदिर शिंपे तालुका शाहुवाडी चा विद्यार्थी वेद संपत पाटील यांची छत्रपती राजर्षी शाहू विद्यानिकेतन प्रशाला शिंगणापूर येथे ” कुस्ती ” या क्रीडा प्रकारातून निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिंपे पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने वेद संपत पाटील यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
वेद पाटील यांना कुस्ती साठी श्री भानुदास पांडुरंग माने सर, सर्जेराव पाटील सर, बाळासाहेब सणगर सर, सदाशिव गोसावी सर, सौ जयश्री कुंभार मॅडम, सौ मनीषा पाटील मॅडम, सर्जेराव पोवार सर ( मुख्याध्यापक ) विद्यामंदिर शिंपे या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. तसेच हनुमान तरुण मंडळ च्या पदाधिकाऱ्यांचे देखील त्यांना मार्गदर्शन लाभले.