सामाजिक

शाहुवाडी चे प्रवेशद्वार करतेय दुर्गंधीनं स्वागत …?

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील शाहुवाडी गावचे प्रवेशद्वार दुर्गंधी च्या साम्राज्यात अडकले असून, याचा त्रास वाहनचालक, पादचारी आणि ग्रामस्थ यांना होत असून, याकडे मात्र सगळ्यांचेच दुर्लक्ष होत आहे.


तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या शाहुवाडी गावाच्या हाकेच्या अंतरावर अनेक शासकीय कार्यालये असूनदेखील याकडे या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केलेले निदर्शनास येत आहे. परंतु येथील दुर्गंधी मात्र जीवघेणी ठरत आहे. इथं कोंबड्यांची पिसे, प्लास्टिक पिशव्यांमध्ये असलेली घाण, तसेच ओला कचरा, सुखा कचरा यांचा ढीग साचताना दिसत आहे.


हि परिस्थिती गेली अनेक वर्षे सुरु असून देखील अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करीत आहे. एकीकडे निर्मलग्राम चा टेंभा मिरवणारे शाहुवाडी पंचायत समिती याबाबत मुग गिळून गप्प असताना दिसत आहे. महामार्गाच्या कडेला असलेला हा कचरा, दुर्गंधी बरोबरच रोगराई पसरवत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष घालून, दुर्गंधीच्या साम्राज्याचा नायनाट करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!