शिक्षकांनी अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवावेत : उदय सरनाईक ( गटशिक्षणाधिकारी )
शाहुवाडी : शिक्षकांनी आर.टी.ई. कायद्यानुसार शाळेच्या वेळेत शाळेत उपस्थित राहिले पाहिजे, समूह अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले पाहिजे. त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या हक्कापासून वंचित न ठेवता, विद्यार्थ्याचे भवितव्य घडवावे, असे शाहुवाडी चे गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांनी सांगितले.

शाहुवाडी तालुक्यातील काही शाळांमधील काही शिक्षक अनधिकृतपणे गैरहजर रहात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, शिक्षक एक समाजातील महत्वाचे आणि विश्वासाचे व्यक्तिमत्व आहे. हि भूमिका पार पाडताना काही शिक्षक भ्रष्ट आहेत, मद्यपी आहेत, हे ऐकणे ,दुर्दैवाचे आहे. दरम्यान काही शिक्षक खुलेआम बर मध्ये बसून मद्यपान देखील करतात. असा मुद्दा अधिकाऱ्यांना विचारला असता, असे वागणे सुद्धा शिक्षकी पेशाला डाग लागण्यासारखे आहे. दरम्यान काही मंडळी असे म्हणतील सुद्धा कि, ते आमचे वयैक्तिक जिवन आहे. हे जरी खरे असले तरी आपण समाजातील एक महत्वाचे घटक आहोत, याकडे सुद्धा दुर्लक्ष होता कामा नये.

शिक्षकांनी आपल्या वागणुकीत बदल करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे लक्ष पुरवावे,अन्यथा इंग्रजी शाळांचे पेव फुटेल, आणि जिल्हा परिषद च्या शाळा बंद पडतील, तेंव्हा सर्व शिक्षक बांधवांनी त्याचबरोबर शिक्षक संघटनांनी सुद्धा याकडे लक्ष देवून संबंधित शिक्षकांच्या गैरवर्तनाला आळा घालावा, असे आवाहन सुद्धा गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांनी केले आहे.