शिव भक्तांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा माझ्यावर गुन्हा दाखल करा – संभाजीराजे छत्रपती
बांबवडे ( विशेष प्रतिनिधी ) : २१ शिवभक्तांवरील खोटे गुन्हे मागे घ्या,अन्यथा माझ्यावर देखील गुम्हा दाखल करा, जोपर्यंत शिव भक्तांवरील गुन्हे मागे घेत नाहीत,तोपर्यंत मी इथून हलणार नाही. असा पवित्रा संभाजीराजे यांनी घेतल्याने पोलीस प्रशासन द्विधा अवस्थेत सापडले असल्याचे समजते.
दरम्यान शाहुवाडी पोलीस ठाण्याने २१ जणांवर कारवाई करून, त्यांना कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. ज्या २१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत,ते खोटे असून, त्याबाबत कोणतेही पुरावे पोलीस प्रशासनाकडे नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा माझ्यावर गुन्हा दाखल करा, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडले आहे.
दरम्यान जर राजेंना अटक झाली, तर महाराष्ट्रात याचे पडसाद उमटतील, याची जाणीव पोलीस प्रशासनाला असल्याने पोलीस प्रशासन तशी कारवाई करणे , याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान राजेंच्या सोबत आत्ताच शेकडो शिवभक्त आले आहेत. जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर हे लोण राज्यभर पसरायला वेळ लागणार नाही. अशीही चर्चा ऐकावयास मिळत आहे.