श्रावणी निकम चे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सुयश : ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील महात्मा गांधी विद्यालय मध्ये शिकत असलेली श्रावणी अरुण निकम हिने जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल पंचक्रोशीतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने श्रावणी अरुण निकम हिचे हार्दिक अभिनंदन.

महात्मा गांधी विद्यालय बांबवडे इथं जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत श्रावणी अरुण निकम या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ती अरुण निकम यांची कन्या आहे.

तिच्या या यशाबद्दल लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले यांनी तिचे अभिनंदन केले आहे. दरम्यान श्रावणी निकम हिची विभागीय स्पर्धेत सुद्धा निवड झाली आहे.