८ नोव्हेंबर रोजी बांबवडे इथं रास्ता रोको आंदोलन : पेट्रोल पंपाजवळ पडलेल्या खड्ड्यांचे कायम स्वरूपी निवारण करा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं दि.८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तशा आशयाचे निवेदन शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. अशी माहिती येथील लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
बांबवडे येथील पेट्रोल पंपाजवळ रस्त्यात खड्डे पडले आहे. त्याबाबत अनेक तक्रारी करूनही कोणतेही अधिकारी यावर उपाय काढत नाहीत. दरम्यान या खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात झाले आहेत. अनेकांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे. परंतु महामार्गाचे अधिकारी, तसेच तहसीलदार शाहुवाडी यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु कोणीही याची जबाबदारी उचलून या खड्ड्यांचे कायमस्वरूपी उपाय काढत नाहीत. केवळ तात्पुरती मलमपट्टी करून वेळ मारून नेली जात आहे.
याच्या निषेधार्थ तसेच या खड्ड्यांचे कायमस्वरूपी निवारण करण्ण्यात यावे, यासाठी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.