धाडस जिद्दी तरुणाईचं : अक्षय पाटील चरणकर
एका अनुभवी लोकप्रतिनिधीच्या विरोधात आणि विद्यमान आमदारांच्या बालेकिल्ल्यात तरूण अक्षय पाटील यांची सरूड जिल्हापरिषदेची उमेदवारी धाडसाचं द्योतकच मानाव लागेल.
पूर्वजांची पुण्याई आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी एका नवं तरुणाने टोकाची लढाई सुरु केली आहे. अक्षय पाटील हे माजी सभापती सदाशिवराव पाटील चरणकर या एकेकाळच्या दिग्गज नेतृत्वाचे नातू आहेत. काही कारणाने हे नेतृत्व काळाच्या ओघात मागे पडले, आणि इतरांनी याचा फायदा घेऊन स्वतःचे पाय रोवले. परंतु निसर्गाने स्वतःच्या चक्राप्रमाणे पुन्हा एकदा नवीन नेतृत्व निर्माण करण्याचा घाट घातला आहे. असेच सध्याच्या वातावरणावरून वाटत आहे.
अक्षय पाटील या तरुण नेतृत्वाने आपला मतदारसंघ पिंजून काढला असून माजी मंत्री विनायरावजी कोरे त्यांच्या प्रचारासाठी सरूड मतदारसंघातून फिरत आहेत.
पुन्हा एकदा नवा बदल घडवून आणण्यासाठी या तरुणाने सुरु केलेली निकराची झुंज भविष्यातल्या राजकारणाला दखल घ्यायला लावणारी ठरत आहे.
आपल्या प्रचारादरम्यान आपल्याला मतदान करून विकासाचा नवा अध्याय सुरु करण्याचं आवाहन श्री अक्षय पाटील मतदारांना करीत आहेत.