डोनोलीत मारुती मंदिराचा आज जीर्णोद्धार सोहळा
डोनोली तालुका शाहुवाडी जि.कोल्हापूर इथं ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून मारुती मंदिर विठ्ठल रुखमाई मंदिर जीर्णोद्धार सोहळा आज संपन्न होत आहे.
इथं ग्रामदैवत भैरवनाथाचे भव्य मंदिर काही वर्षांपूर्वीच लोकवर्गणीतून उभारले आहे.याच मंदिराच्या शेजारी असलेल्या मारुती व विठ्ठल रखुमाई मंदिराची पडझड झाली होती.त्यामुळे ग्रामस्थ व युवा वर्गाने या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मुद्दा उचलून धरला आणि सर्व ग्रामस्थांनी त्यास अनुमती दिली.यातूनच हे मारुती मंदिर आकारास आले .
या शुभप्रसंगी आज दि.१ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता ह.भ.प. श्री सचिन महाराज यांचे कीर्तन होणार आहे. उद्या गुरुवार दि.२ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता श्री बालयोगी महाराज मठाधिपती सौते ता. शाहुवाडी यांच्या हस्ते श्री भैरवनाथ,श्री काळभैरव, श्री जोगेश्वरीदेवी, श्री मारुती,श्री गणपती,श्री विठ्ठल रखुमाई या सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.रात्री साडेनऊ वाजता सोंगी भजनाचा कार्यक्रम होणार असून, पंचक्रोशीतील भक्तजनांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.