आंबेडकरी विचारांचे लेखक डॉ.किरवले यांची हत्त्या दुर्दैवी
कोल्हापूर : डॉ. कृष्ण किरवले या आंबेडकरी विचारांचे प्रगल्भ लेखक असलेले डॉ.कृष्ण किरवले यांची हत्त्या आर्थिक व्यवहारातून झाली असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.
पुरोगामी नेते गोविंद पानसरे, सारख्या नेत्यांच्या मागोमाग अशा हत्या होऊ लागल्या आहेत.डॉ. किरवले हे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत होते. त्यांची हत्या केल्याचे प्रीतम गणपत पाटील (वय ३० वर्षे ) याने काबुल केले असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
दरम्यान या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून या हत्त्येमागे इतर कारणांचाही तपास करण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.