शाहुवाडीत महिलादिनानिमित्त विविध उपक्रम
शाहु वाडी तालुक्यात महिला दिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला .विविध वेशभूषा करून शालेय विदयार्थ्या यांनी जनजागृती फेरी तर तहसील कार्यालय शाहु वाडी, पोलीस ठाणे शाहु वाडी यांच्या वतीन ही महिला दिना निमित्त कार्यक्रम घेण्यात आले .
शाहु वाडी तहसील कार्यालयाचे वतीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शाहु वाडी येथे मुद्रा बँक लो न, यासह विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली यावेळी तहसीलदार चंद्रशेखर सानप , पो नि अनिल गाडे , जिप सदस्या सौ आकांक्षा पाटील प स सदस्या सौ डॉ स्नेहा जाधव , महिला व बाल संरक्षण अधिकारी योगेश नलवडे , समुपदेशक विजय सिंह पाटील यांनी महिला विषयी विविध कायदया विषयी माहिती दिली . या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका , महसूल , पोलीस प्रशासन चे कर्मचारी उपस्थित होते .
दरम्यान शाहु हायस्कुल शाहु वाडी येथे पो . नि अनिल गाडे यांनी ही मार्गदर्शन केले या पी एस आय श्रीराम पडवळ यांच्यासह मुख्याध्यापक , अध्यापक , पोलीस कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते .