शाहूवाडी उत्तर भागातील कानसा नदी पात्र पडले कोरडे.
शाहूवाडी उत्तर भागातील कानसा नदी पात्र पडले कोरडे.
सोंडोली / वार्ताहर
शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील कानसाखो-यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी टंचाई जानवू लागली असुन कानस नदी पात्र कोरडे पडले आहे. मालेवाडी – सोंडोली दरम्यान असणारी कोल्हापूरी पद्धतीची फरशी दुरुस्ती विन पडून असून परीसरातील शेतकरी पाटबंधारे विभागाकडे वारंवार तक्रारी करुनही मालेवाडी फरशी कडे दुर्लक्ष करीत असल्याने व शेती साठी पाणी टंचाई जाणवत असल्याने या परीसरातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावारण आहे.
या भागात सोंडोली – मालेवाडी दरम्यान कानसा नदीवर पाणी अडवण्यासाठी काही वर्षापूर्वी कोल्हापूर पद्धतीचा बधंरा पाटबंधारे विभागा मार्फत बांधण्यात आला होता. या बंधा-यामुळे परीसरातील शेतीला पाणी मिळावे या उद्धेशाने बांधण्यात आला असूनहि काही वर्षापासुन दुरुस्ती विना कुच कामी ठरला आहे. हा बंधारा दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाने न केल्याने येथे पाणी साचत नसल्याने येथील शेतीसाठी पाणी पुरत नाही.
शाहूवाडी तालुक्यातील उत्तर भागातील जाबूंर , थावडे , विरळे , मालेवाडी परीसरातील शेतकऱ्यांना गेले आठ दिवसांपासून शेती साठी पाणी टंचाई ला सामोर जावे लागत आहे. काडंवण धरणातून आठवड्यातून एकवेळ पाणी सोडले जात असून नदीकाठच्या सर्व मोटरपंप चालू असल्याने शेवट पर्यंत पाणी पोहचत नाही . त्यामुळे मालेवाडी – सोंडोली बंधारा दुरुस्तीचे काम करावे अशी मागाणी शेतकरी वर्गातून होत आहे.