पिशवी जि.प. व पं.स. सदस्यांचा बांबवडेत सत्कार
बांबवडे इथे मानसिंग दादा गट व आम.सत्यजित पाटील आबा गट आणि ग्रामस्थांच्या वतीने मारुती मंदिराच्या व्यासपीठावर नूतन जिल्हापरिषद सदस्य पैलवान विजय बोरगे ,व पंचायत समिती सदस्या सौ.अश्विनी पाटील व सौ सुनिता पारले यांचा सत्कार करण्यात आला.
पिशवी जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत साळशी चे पैलवान विजय बोरगे हे विजयी झाले ,तर पंचायत समिती साठी पिशवी गणातून सौ.अश्विनी संदीप पाटील व बांबवडे गणातून सौ.सुनिता सुरेश पारले विजयी झाल्या.
या सत्कारास उत्तर देताना पैलवान बोरगे म्हणाले कि, सामान्य जनतेने दिलेले मतदान हे माणुसकी साठी दिले असून धनशक्ती विरोधात दिलेला हा कौल आहे.ह्याची मला जाण असून ह्या मतदार संघाच्या विकासासाठी मी चोवीस तास तत्पर राहीन,ह्याची ग्वाही देतो.
यावेळी श्री.सुरेश पारले,संदीप पाटील ,बांबवडे ग्रामपंचायत सदस्य अभयसिंह चौगले आदींनी मनोगते व्यक्त केली.आभार श्री राजेंद्र निकम यांनी मानले.
Good news to be touch with our area