करुंगळे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी घातली मायेची साद
मलकापूर प्रतिनिधी :
दुरावत चाललेल्या प्राणीमात्रां ना करूंगळे शाळेच्या विदयार्थ्यांनी घातलेली मायेची साद ही मानवी मनाला मायेचा पाझर फोडण्याबरोबरच आदर्शवत असल्याचं प्रतिपादन केंद्र प्रमुख अंकुश बडे यांनी करूंगळे येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले .
विदया मंदीर करूंगळे शाळेतील उपक्रम शिल शिक्षक विनायक हिरवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘घरटे बनविणे’ उपक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बी के पवार हे होते .
पुढे बोलताना अकुंश बडे म्हणाले कि, पक्षाची घरटे नामशेष होऊ लागली आहेत . मात्र करूगंळे शाळेतील विदयार्थांनी टाकाऊ कॅनपासून बनवलेली घरटी आदर्शवत आहेत . या निमित्तानं विद्यार्थी आणि पक्षी यांचं एक जिव्हाळ्याच नातं निर्माण झालं आहे .
विनायक हिरवे म्हणाले कि, आज पाण्याविना आणि घरट्याविना पक्षी दुरावत चालले आहेत . आणि अशा वेळी विद्यार्थी आणि समाज यांना प्रेरणा आणि प्राणी मात्रा विषयी ओढ् निर्माण करणारा हा उपक्रम हाती घेतला . या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला आहे .
यावेळी आल्तूर शाळेचे मुख्याध्यापक दिग्वीजय कुंभार , प्रतिष्ठीत नागरीक बी के पवार आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमास विदया मंदीर माळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक संभाजी लोहार , करूं गळे शाळेचे मुख्याध्यापक संजय आपटे अध्यापक सर्जेराव पाटील ,अमोल बहे कर , श्री गावीत आदि सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . मुख्याध्यापक संजय आपटे यांनी आभार मानले
.