नाम. सदाभाऊ खोत हारुगडेवाडीच्या कुस्ती आखाड्यात
हारुगडेवाडी तालुका शाहुवाडी मध्ये राज्याचे कृषिमंत्री नाम.सदाभाऊ खोत आले होते.
हारुगडेवाडी च्या जत्रेच्या अनुषंगाने येथे कुस्त्यांचे भव्य मैदान आयोजित केले होते. या कुस्ती फडाचे उद्घाटन नाम. सदाभाऊ खोत यांचे हस्ते कुस्ती लावून करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलुख मैदान तोफ म्हणून नाम.सदाभाऊ यांची इथं ख्याती आहे. एकेकाळी त्यांच्या घणाघाती भाषणावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जीव ओवाळून टाकला होता. आज तेच सदाभाऊ मंत्र्यांच्या रुपात जेंव्हा कुस्ती मैदानात आले, तेंव्हा मात्र इथला शेतकरी भावूक झाला.
यावेळी शिराळा तालुक्याचे सत्यजित देशमुख,शाहुवाडीचे तहसीलदार चंद्रशेखर सानप, पोलीस निरीक्षक अनिल गाडे, व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.