नावली जवळ डंपरची ट्रॅक्तरला धडक : एक गंभीर

आसुर्ले ( प्रतिनिधी ) : नावली तालुका पन्हाळा जवळ डंपरची ट्रॅक्तरला मागून धडक बसल्याने ट्रॅक्तरवर ड्रायव्हर च्या शेजारी बसलेला युवक उडून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आहे.
डंपर कोल्हापूरहून रत्नागिरी दिशेला  निघाला होता. दरम्यान नावली गावाजवळ ट्रॅ्क्तर क्रमांक एम एच ०९-बीपी ३२४२ ह्या रत्नागिरी दिशेला निघालेल्या ट्रॅ्क्तरला त्याने मागून धडक दिली. ह्यामुळे ड्रायव्हर शेजारी बसलेला अक्षय शिंदे हा युवक उडून खाली पडला, त्यामुळे त्याच्या पाठीवरून ट्रॉलीचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ जवळच्याच खाजगी रुग्णालयात नेले. दरम्यान डंपरचा चालक फरार झाला आहे.

2+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!