मद्यपी एसटी चालकामुळे प्रवाशी संकटात
देवाळे प्रतिनिधी (प्रभाकर पाटील): प्रवाशांच्या सतर्कतेमुळे दारू पिऊन एस.टी. चालवणाऱ्या चालकाला एस.टी. थांबवण्यास भाग पडल्याने अपघात होता होता वाचल्याने बस मधील सुमारे ५० प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. याबाबत कोडोलो पोलीस ठाण्यात चालक संभाजी पवार(वय ४२ वर्षे) रा.पलूस,जि.सांगली यांचे विरोधात बेजबाबदार पने वाहन चालविल्याबद्दल गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, दि.१८ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास कोल्हापूरहून कोल्हापूर-रत्नागिरी बस क्रमांक MH14 BT 3008 हि बस घेऊन चालक संभाजी पवार य वाहक डी.बी.कुणेकर रत्नागिरीकडे जात असता चालक दारू पिऊन वाहन चालवत होता. यावेळी वाघबीळ घाट ते बोरपाडळे दरम्यानच्या अंतरात ३-४ वेळा वाहन अपघात होता होता वाचला. हा प्रकार प्रवाशांच्या लक्षात आल्याने प्रवाशी प्रदीप पाटील, रामचंद्र जाधव,धनंजय देसाई,वाहक कुणेकर यांनी चालक पवार यास गाडी थांबवण्यास सांगितले. परंतु वाहक कोणाचे न ऐकता चालक बेजबाबदार पणे गाडी चालवत होता.. अखेर पुढे सुद्धा एका वाहनाला धडक होता होता वाचल्याने प्रवाश्यांनी आरडओरड सुरु केली. यामुळे अखेर वाहन थांबवले.
याबाबत चालकास ताब्यात घेऊन पोलीस आनंदराव कदम, जावेद गडकरी घटन्स्थळाची पाहणी करून चौकशी केली.यावेळी एस.टी.चे मलकापूर आगार प्रमुख अभिजित पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली व पर्यायी चालक देऊन प्रवाशांची सोय केली.