निळे जवळ ट्रक – दुचाकी अपघातात एक ठार
मलकापूर प्रतिनिधी (एस.कुंभार): कोल्हापूर रत्नागिरी मार्गांवर निळे गावच्या हद्दीत ट्रक व मोटरसायकल अपघातात कुंभारगाव शिबेवाडी तालुका कराड येथील युवक जागीच ठार झाला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार, शिबेवाडी तालुका कराड येथील अमित शिवाजी शिबे व प्रकाश उत्तम लोहार हे आपल्या मोटर सायकल वरून रत्नागिरी कडे जात असता निळे गावच्या हद्दीत ट्रकला मोटारसायकल धडकल्यामुळे झालेल्या अपघातात प्रकाश लोहार जागीच ठार तर जखमी अमित शिबे यास उपचारासाठी मलकापूर ग्रामीण रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची शाहुवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.