खास.संभाजीराजे यांच्या हस्ते शाहुवाडी श्री कुस्ती स्पर्धा
मलकापूर (प्रतिनिधी) : रविवार दि.२ एप्रिल रोजी दुपारी २.०० वा.खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते “शाहुवाडी श्री” कुस्ती स्पर्धांचे आयोजन पैलवान श्री.प्रकाश काळे पणुंद्रेकर व पैलवान श्री. दत्ता वारकरी कोपर्डेकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
या कुस्त्यांचे भव्य जंगी मैदान शाहुवाडी येथे आयोजित करण्यात आले असून,पहिले बक्षीस श्री बाबुराव सागांवकर (पेरीड )प्रणीत इंजिनिअर्स पुणे यांच्याकडून २१००० रुपये जाहीर करण्यात आले आहे. वस्ताद बाळू काळे पणुंद्रेकर (मुंबई शहर संयुक्त सरचिटणीस ),व पैलवान चंद्रकांत पाटील (मुंबई पोलीस )करंजोशी यांच्याकडून चांदीची गदा व श्री. कैलास भोसले युवा नेते मुंबई येळाणे यांचेकडून द्वितीय बक्षीस १०,००१ /-रुपये, सदाशिव बाबुराव पाटील कोपर्डेकर लेखापरीक्षक कोल्हापूर यांचेकडून तृतीय बक्षीस ७,००१/- रुपये जाहीर करण्यात आले आहे.
या कुस्ती स्पर्धा श्री शिवगंगा सर्व्हिसिंग सेंटर ,शाहुवाडी पेट्रोल पंपासमोर खेळवल्या जाणार आहेत. या स्पर्धेसाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी पैलवान श्री प्रकाश काळे पणुंद्रेकर ९९२३५५०९६, श्री दत्ता वारकरी ९६३७३६१००३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.