आंबवडे येथे ग्रामस्थांकडून रास्ता रोको
वारणा-कोडोली प्रतिनिधी (सनी काळे)
आंबवडे ता.पन्हाळा येथील सैनिक दिपक भुजिंगा पोवर यांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यांचा भाजून मृत्यू झाला असून, त्यांच्या मृत्यूला त्यांची पत्नी सविता हि जबाबदार असल्याचे गावकरी लोकांचे म्हणणे आहे.पण सविता अजून मोकाट फिरत आहे.तसेच दिपक आणि सविताचा ६ वर्षीय मुलगा हा अद्याप सविता कडे आहे. त्याचा ताबा दिपकच्या आई वडिलांना मिळवा. या मागणीसाठी आज आंबवडे ग्रामस्थानी रस्ता रोको आंदोलन केले. हे आंदोलन साधारण पणे १ तास चालले.
दिपक पोवार हे ९ महाराष्ट्र बटालियन मध्ये नायक या पदावर कार्यरत होते। त्यांची नेमणूक बेळगाव येथे होती.पण ते मिलिटरी कॅम्प मध्ये न रहाता, खाजगी घरात रहात होते. ते दिनांक १८ मार्च २०१७ रोजी ९५ टक्के भाजून गम्भीर जखमी झाले होते. त्यांना बेळगाव येथील केएल हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. त्याचा उपचार सुरु असताना , दिनांक २७ मार्च रोजी मृत्यू झाला. त्यांचा अंतिम विधीला गावकर्यांनी सविताला गावात येऊ दिल नाही आणि त्यांचा मुलगा उत्कर्ष च्या हस्ते अंतिम विधी करण्यात आला.पण सविता ही दिपकच्या मृत्यूला करणीभूत असल्यामुळे तिला गावात येऊन न देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय. तसेच तिला अटक करून ,तिच्या मुलाचा ताबा दिपकच्या आई वडिलांना मिळवा या मागणी साठी आज दिपकच्या रक्षाविसर्जन दिवशी ग्रामस्थांनी विधी न करता आज बुधवार दिनांक सकाळी १० वाजता आंबवडे इथे रास्ता रोको केल
पन्हाळा शाहूवाडी विभागाचे पोलीस उप अधीक्षक सुरज गुरव यांनी घटना स्थळी येऊन ग्रामस्थांना योग्य त्या कारवाहीचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. तसेच दिपकच्या रक्षा विसर्जन विधीला त्यांचा ६ वर्षाचा मुलगा उत्कर्ष याला हि पोलिसांनी सविता कडून आणून साधारण पणे दुपारी 3 वाजता रक्षा विसर्जन विधी पार पडला.दरम्यान दिपकच्या मृत्यूला सविता प्रमुख जबाबदार असून तिला प्रथम अटक करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.