येत्या पाच वर्षात गावचा सर्वांगीण विकास करणार -सरपंच शित्तूर-वारूण
सोंडोली (प्रतिनिधी ) : निवडणुकी दरम्यान ग्रामस्थांना दिलेला शब्द सावकर साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करीत आलो आहोत. भविष्यात गावचा सर्वांगीण विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,असे शित्तूर-वारूण चे सरपंच तानाजी भोसले यांनी सांगितले.
शित्तूर-वारूण येथील वेताळ गल्लीतील काँक्रिटीकरण पूर्ण केले असून ,दलितवस्ती मधील काँक्रिटीकरण सुद्धा पूर्ण केले आहे. तसेच गोल्डन गल्लीतील गटर बांधकामास देखील प्रारंभ केला आहे. येत्या पाच वर्षात गावचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही,असेही तानाजी भोसले यांनी सांगितले.