कोल्हापूर जिल्हापरिषदेत शाहुवाडीला सभापती ?
बांबवडे (प्रतिनिधी):कोल्हापूर जिल्हा परिषदेत शाहुवाडीच्या वाट्याला सभापती पद मिळणार,अशी अपेक्षा शाहुवाडीच्या जनतेकडून केली जात आहे.
सध्या जिल्हापरिषदेत भाजपने सेनेच्या सहकार्याने सत्ता स्थापन केली आहे. यामध्ये शाहुवाडीकरांचाही वाटा आहे. कारण भाजपचे मित्र पक्ष म्हणजे जनसुराज्य पक्ष यांच्यावतीने अत्यंत चुरशीच्या लढतीत सर्जेराव पाटील पेरीडकर हे विजयी झाले. सत्तेच्या बेरजेच्या राजकारणात शिवसेनेच्या अगोदर जनसुराज्यने आपले खांदे भाजपसाठी दिले होते. त्यानंतर सेनेनेही भाजपला मदत केली. यात विद्यमान आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनीही आपले शिलेदार भाजपच्या गोळाबेरजेत मिळवले. म्हणूनच त्यांच्या सत्तेत शाहुवाडीचा खारीचा का होईना वाटा आहे. यासाठी एखादे सभापती पद शाहुवाडीला मिळाले पाहिजे ,असा आशावाद ठेवण्यास शाहुवाडीकरांना हरकत नाही. हे पद जनसुराज्य चे असावे कि, सेनेचे हा प्रश्न भाजप नेत्यांचा आहे. पण येत्या ३ एप्रिल ला शाहुवाडीच्या वाट्याला एक तरी सभापती पद मिळावे, हा शाहुवाडीकरांचा आग्रह आहे.