10 मे ला सरूड मध्ये मॅरेथॉन स्पर्धा
बांबवडे ( प्रतिनिधी ) : १० मे २०१७ रोजी सरूड इथं ‘सरूड स्पोर्ट्स फौंडेशन सरूड’ च्यावतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हि स्पर्धा १० किलोमीटर अंतराची असणार आहे. सरूड ते बांबवडे व पुन्हा बांबवडे ते सरूड असा मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग असणार आहे. तरी स्पर्धेत तालुक्यातील तरुणांसाहित बुजुर्ग मंडळींनी देखील सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ९०११०७२३२८, ९८६००२६७५८, ९८९०८६९०९८, असेही आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.