कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न
अहमदनगर : कोपर्डी प्रकरणातील आरोपींना जिल्हा न्यायालयात नेत असताना, न्यायालयाच्या परिसरातच आरोपींवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोपर्डी प्रकरणातील आरोपी संतोष शिंदे, जितेंद्र भवाळ ,नितीन भैलुमे यांना सुनावणी साठी न्यायालयात आणले असताना, त्यांच्यावर चाकूने हाल करण्याचा प्रयत्न झाला,परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. याबाबत राजेंद्र जऱ्हाड, बाबुराव वाळेकर, अमोल खुने, गणेश खुने यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.