शाहुवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा : श्री सर्जेराव पाटील पेरीडकर बांधकाम सभापती
कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील जनसुराज्य पक्षाचे खंदे नेते श्री सर्जेराव पाटील पेरीडकर यांची कोल्हापूर जिल्हापरिषदेच्या बांधकाम समितीच्या सभापती पदी निवड झाल्याने शाहुवाडी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेलाय. दरम्यान जनसुराज्य पक्षाच्यावतीने श्री विशाल महापुरे यांना समाजकल्याण खात्याचे सभापती पद प्राप्त झाले आहे. या दोघांनाही ३७ मते मिळाली आहेत.
सर्जेराव पाटील पेरीडकर दादा शित्तूर- वारुण मतदारसंघातून निवडून आले होते. या मतदार संघातील त्यांचा राबता पाहता येथील जनतेने त्यांचे नेतृत्व हृदयात जपले आहे, हे त्या मतदारसंघात फिरताना आपल्याला जाणवते. सर्व सामन्यांच्या हाकेला कधीही धावून येणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. स्व. आमदार संजयसिंह गायकवाड यांनी ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांचे मोहोळ जपले होते, अगदी त्याचप्रमाणे सर्जेराव दादांनी आपली प्रतिमा तयार केली आहे. त्यांच्या या सभापती पदामुळे तालुक्यात पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले आहे.