सामाजिक

सगळ्याच कर्जबाजारी शेतकऱ्यांची कर्जे माफ करा -हायकोर्टाचा आदेश

राज्यातील सगळ्याच शेतकऱ्यांची कर्जे माफ करा,असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला आज दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे १,९८० /- कोटींचा अतिरिक्त भर तामिळनाडू सरकारवर पडणार आहे. या कर्जमाफीचा लाभ ३.०१ शेतकऱ्यांना होणार आहे. तामिळनाडू सरकारने २८ जून २०१६ रोजी ५ एकरपेक्षा कमी शेती असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील ५ ,७८० कोटींचं कर्ज माफ झालं. यातुन१६लख९४ शेतकऱ्यांची कर्जे माफ झालीत. नैसर्गिक आपत्तीत गरीब व श्रीमंत सगळ्याचं शेतकऱ्यांच नुकसान होते, तेंव्हा सर्वच शेतकऱ्यांची कर्जे माफ केली जावीत,असे आदेश एस.नागमुत्थू आणि एम.व्ही. मुरलीधरन या खंडपीठाने तामिळनाडू सरकारला दिले आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!