शाहुवाडीच्या हृदयात आजही वसतंय एक हळवं नेतृत्व : स्व. संजयदादा

निसर्ग संपन्न आणि मुबलक पाऊस असलेला हा शाहुवाडी तालुका ऐन उन्हाळ्यात मात्र हतबल होतो. आणि सुरु होतेय भटकंती घोटभर पाण्यासाठी. अशा परिस्थितीवर मत करणारं एक नेतृत्व कधीकाळी नांदत होतं. त्याच नेतृत्वाने घोटभर पाण्याची तहान भागवली भगीरथाच्या प्रयत्नाने, आणि निर्माण झाले अनेक सरोवर पिण्यासाठी, आणि शेतीसाठी. ते होते शाहुवाडीच्या हृदयातील हृदय सम्राट स्व.आमदार संजयसिंह गायकवाड. असं नेतृत्व आपल्यातून जावून आज १४ वर्षे पूर्ण होताहेत. १४ वर्षांचा हा वनवास या रामनवमी निमित्त पुन्हा एकदा समोर उभा राहतोय.आणि इथं होतेय बेरीज, वजाबाकी आपल्यांची आणि परक्यांची.
एकेकाळी तालुक्यातील पाण्याचा दुष्काळ संपवण्यासाठी या व्यक्तिमत्वाने मंत्री पदाचा त्याग केला. कारण माझा खुळा कावरा शेतकरी बांधव संपूर्ण उन्हाळा पाण्यासाठी तडफडतोय. त्याच्या उशाला जोपर्यंत पाणी पोहचवणार नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. असा स्वतःशीच केलेला संकल्प या अवलियाने जाता, जाता तालुक्याच्या पदरात टाकून गेला. आज त्याच मध्यम पाटबंधारे तलावांवर वीज निर्मिती केली जातेय. केवढा हा चमत्कार. परंतु एवढं करूनही आज पदराला हात पुसणारी माणसं काही कमी नाहीत.
तालुक्याचं युवा नेतृत्व म्हणजे कर्णसिंह गायकवाड. हेही काही कमी तोलामोलाचं व्यक्तिमत्वं नाही. आपल्या वडिलांचे गुण त्यांच्याकडेही आहेत. त्यांनाही वाटतं आपण पण जनतेच्या सेवेत कार्यरत राहावं.आणि तसा प्रयत्न हि त्यांचा आहे. पण एक गोष्ट कमी पडते, ती म्हणजे माणसे ओळखण्याची. ह्या भोळ्या स्वभावाला कुणीही शिकवण्याचा यथासांग प्रयत्न करतो. स्व.संजयदादा हे जनतेच्या सेवेत असायचे, पण शिवाजी महाराजांसारखा गनिमीकावा त्यांनी सोबत ठेवला होता. म्हणूनच सगळं मंत्रालय दादा आले कि, वाट द्यायचे. एका अपक्ष आमदाराचा एवढा दरारा म्हणजे, औरंजेबाच्या छावणीत दाखल होणारे महाराजं च म्हणावयास हरकत नाही. दादांच्या या गुणांचा स्वीकार व्हावा, यासाठी अवघी संजयदादा प्रेमी जनता वाट पाहतेय,आपल्या नव्या नेतृत्वाची. दादांचा गनिमीकावा आत्मसात करा, आणि संजयदादा प्रेमी जनतेची तहान भागवा, असंच म्हणणं आहे,खुळ्या कावऱ्या जनतेचं. दादांच्या या स्मृतीदिनी एवढा संकल्प पूर्ण करा, असे आवाहन शाहुवाडीची जनता करीत आहे.
स्व.आमदार संजयदादांना   माझ्या परिवाराच्यावतीने भावपूर्ण आदरांजली !!!!!

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!