“उदय साखर” मध्ये “मानसिंग दादा” गटाचेच वर्चस्व
बांबवडे : उदय सहकारी साखर कारखाना बांबवडे-सोनवडे,च्या पंचवार्षिक निवडणुकीत मानसिंग दादा गटाचेच वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. या निवडणुकीत रणवीर सिंग गायकवाड यांच्यासह ११ संचालकांचे अर्ज राहिल्याने ,त्यांची बिनविरोध निवड झालीय.
कारखान्याचे संचालक रणवीर सिंग गायकवाड हे अतिशय चुरशीच्या जिल्हापरिषद निवडणुकीत पराभूत झाले होते. परंतु पराभवाचे ओझे डोक्यावर न घेता पाठीवर टाकत, त्यांनी पुन्हा एकदा प्रतिष्ठेची लढाई लढली, आणि यात त्यांना यश आलंय. मुळातच अडचणीत असलेला साखर कारखाना चालवताना त्यांना खूप जिकरीचे कष्ट घ्यावे लागत होते. त्यातंच जिल्हापरिषद आणि त्यापाठोपाठ कारखान्याची निवडणूक हा खेळच न्यारा होता. परंतु या खेळात रणवीर सिंग गायकवाड यशस्वी झाले.
उदय सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अतिशय चर्चेचा विषय झाला होता,तर मानसिंगराव गायकवाड गटासाठी हा प्रतिष्ठेचा विषय झाला होता. यात रणवीर सिंग गायकवाड सरकार यांच्यासह ११ संचालक बिनविरोध झाल्याने शेतकरी व सभासद वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.