वारणा कर्मचाऱ्यांना नव्या वर्षाची वेतनवाढ भेट : श्री विनय कोरे
वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के वेतनवाढ करण्यात आल्याची घोषणा वारणा उद्योग समूहाचे प्रमुख श्री विनय कोरे यांनी केली आहे.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा वेतावाढ करार संपला असून नवीन वेतनवाढ संदर्भाने त्रिपक्षीय समिती नेमण्यात आली. हि समिती व साखर कारखान्याचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत १५ टक्के वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ व साखर आयुक्त यांच्या निर्देशानुसार हा वेतनवाढ करण्याचा निर्णय झाला. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याबाबत कारखान्याच्या अध्यक्षा व संचालक मंडळ यांच्यात झालेल्या सभेत हा निर्णय झाला असल्याची माहिती,वारणा उद्योग समूहाचे प्रमुख श्री विनय कोरे यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष श्री प्रतापराव पाटील, सर्व संचालक, व डायरेक्टर व्ही. एस. चव्हाण, कार्यकारी संचालक व्ही.एस.कोले, आदि मंडळी उपस्थित होती.